पुणे

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (1 ऑगस्ट) महसुली सेवांबाबत मोठी घोषणा

स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सवलतीचा मोठा फायदा

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (1 ऑगस्ट) महसुली सेवांबाबत मोठी घोषणा

स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सवलतीचा मोठा फायदा

पुणे : बारामती वार्तापत्र

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (1 ऑगस्ट) महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केलीय. यानुसार आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा (7/12) मिळणार आहे. यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचले आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असंही थोरातांनी नमूद केलं. ते पुण्यात बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “आज महसूल दिन त्यानिमित्ताने शुभेच्छा. या निमित्ताने काही सेवा सुरू करत आहोत. यामुळे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू होईल. सर्व सेवा ऑनलाईन असेल. सात बारा ऑनलाईन केलाय. आजपासून 7/12 नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. त्यासाठी खूप काम करावे लागले. मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आलीय. ई म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेय, लवकरच मिळेल. 4 ठिकाणी जमिनी असतील तर एकच सातबारा मिळेल. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळतील. यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे.”

स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सवलतीचा मोठा फायदा

“स्टॅम्प ड्युटीत 6 महिने सवलत देण्यात आली. या काळात अनेक कागदपत्रे रजिस्टर झाली. याची नागरिकांना मोठी मदत झाली. बिल्डर, डेव्हलपर्स यांनाही मदत झाली. आम्हाला सुद्धा त्याचा चांगला फायदा झाला,”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे.”

“जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही”

“सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते सोडवू,” असंही थोरातांनी नमूद केलं.

“हे वर्ष नैसर्गिक संकटाचे राहिलं”

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “हे वर्ष नैसर्गिक संकटाचे राहिले आहे. कोकणात 2 चक्री वादळे आली, अतिवृष्टी झाली. कोल्हापूर, सांगलीत पूर आला. त्यानंतरही आम्ही जनजीवन सुरळीत केलं. नैसर्गिक संकटाचा फटका बसलेल्यांना मदत झाली पाहिजे हेच आमचं मत आहे.” फडणवीस यांच्या काळात त्यांनी किती कलमे लावली? त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते येणार होते आले नाहीत, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांविरोधात व्यापारी आंदोलन करणार असल्याच्या मुद्द्यावरही थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सर्वांनाच त्रास होतो. या काळात व्यापार कमी झाला. मर्यादा लावल्याने काही अडचणी आल्या. मात्र, आरोग्याच्या हिताचे काय याचा विचार झाला पाहिजे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!