राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरचे जेवण देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत कोर्टाने देशमुखांच्यावतीने करण्यात आलेला विनंती अर्ज फेटाळून लावला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरचे जेवण देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत कोर्टाने देशमुखांच्यावतीने करण्यात आलेला विनंती अर्ज फेटाळून लावला आहे.
प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोठडीत घरचे जेवण देण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आली आहे. आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत कोर्टाने देशमुखांच्यावतीने करण्यात आलेला विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच देशमुखांना ईडी ऐवजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत त्यांना घरचं जेवण मिळण्याची विनंती केली होती. त्यावर आधी तुम्ही तुरुंगातील जेवण घ्या. योग्य वाटलं नाही तर विचार करू, असं कोर्टाने सांगितलं. मात्र, त्यांना तुरुंगात वेगळा बेड देण्याची विनंती मान्य करण्यता आली आहे. प्रकृतीचं कारण दिल्याने त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.