मुंबई

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोवीड १९ संसर्गाचा शिरकाव

खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड १९ संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोवीड १९ संसर्गाचा शिरकाव

खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड १९ संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) सुधीर नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. नाईक यांची कोविड-19 संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वाँक्हार्ट हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणुन मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड 19  संसर्ग तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचं सँनिटायझेशन करण्यात आलंय.

याआधीही मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी  कोरोनाने शिरकाव केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती.  कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा 20 तारखेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram