राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. अनिल वळवी यांचे निधन
त्यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2022/05/download-3.jpg)
राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. अनिल वळवी यांचे निधन
त्यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
प्रतिनिधी
राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. अनिल वळवी यांचे काल ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत धानोरा, नंदुरबार येथील आश्रम शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर १९९३ साली ते शासनाच्या सेवेत रुजू झाले. त्यानंतर गेली २७ वर्षे सलग ते राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात कार्यरत होते. आपल्या सहकाऱ्यांमध्ये अबोल पण मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित असलेले अनिल वळवी म्हणजे राज्यातल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा चालता बोलता कोश आहेत, अशी त्यांची ओळख होती.
श्री. वळवी यांच्या निधनाबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. वळवी यांच्या जाण्याने निवडणूक यंत्रणेची भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांनी भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.