इंदापूर

राज्याच्या सहकार चळवळीतील दोन दिग्गज नेते देशाचे सहकारमंत्री अमित शहांच्या भेटीला

राज्यातील राजकारणात भेटीची जोरदार चर्चा

राज्याच्या सहकार चळवळीतील दोन दिग्गज नेते देशाचे सहकारमंत्री अमित शहांच्या भेटीला

राज्यातील राजकारणात भेटीची जोरदार चर्चा

इंदापूर: प्रतिनिधी
देशाची राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील या दोन महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी मंगळवारी (दि.१०) भेट घेऊन सहकार तसेच साखर उद्योग व इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अमित शहा यांचा सत्कार केला.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख दिग्गज नेत्यांनी केंद्रीय सहकार मंत्री आमित शहा यांची भेट घेतल्याने राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधुन घेतले आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग ७ वर्षापेक्षा अधिक काळ सहकार मंत्री होते. तसेच ते पणन मंत्री असताना भारत सरकारने कृषी व पणन संदर्भात नेमलेल्या देशपातळीवरील विविध राज्यांच्या पणन मंत्र्यांच्या समितीचे अध्यक्षही होते.

देशामध्ये महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेत. केंद्र सरकारने प्रथमच सरकार हे खाते निर्माण केल्याने व या खात्याचे मंत्रीपद अमित शहा यांच्याकडे असल्याने देशातील सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते असल्याने अमित शहा यांचेशी झालेल्या भेटीची जोरदार चर्चा राज्यातील सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणावर सहकार क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. राज्यातील सत्तेच्या चाव्या सहकार क्षेत्रावर अवलंबून असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील या दोन प्रमुख नेत्यांची अमित शहा यांच्याशी झालेली भेट राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल अशीही चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button