मुंबई

राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी,सीएनजी (CNG) स्वस्त होणार

सरकार CNG वरचा टॅक्स 13.5 टक्यांवरुन ३ टक्यावर करणार आहे.

राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी,सीएनजी (CNG) स्वस्त होणार

सरकार CNG वरचा टॅक्स 13.5 टक्यांवरुन ३ टक्यावर करणार आहे.

मुंबई :प्रतिनिधी

राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी (CNG) स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत.

नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आलाय. साडे तेरा टक्क्यांवरुन सीएनजीवरचा कर ३ टक्क्यांवर आणण्यात आलाय. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्यानं पीएनजीही स्वस्त होणार आहे. मात्र पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सरकारनं करकपात केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कुठलाही दिलासा मिळालेला नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.

इतर महत्त्वाच्या घोषणा

>> मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी

> हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील.

>> तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार

>> आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद.

>> अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार.

>>एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत

>> महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केली आहे.

>> कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram