इंदापूर मधील नगरसेविकेच्या पतीला झाला कोरोना… शहरात एकाच दिवसात कोरोनाचे दोन रुग्ण…
एकाच दिवशी दोन रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण इंदापूर शहर पुन्हा हादरले...

इंदापूर मधील नगरसेविकेच्या पतीला झाला कोरोना…
शहरात एकाच दिवसात कोरोनाचे दोन रुग्ण..
एकाच दिवशी दोन रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण
इंदापूर शहर पुन्हा हादरले…
इंदापूर शहर आज पुन्हा एकदा हादरलेला आहे, कारण ही तसेच आहे शहरात एकाच दिवसात दोन कोरोनाग्रस्त आढळलेले आहेत, शहरातील रामवेस नाका येथील 38 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या 22 जणांचे स्वँब घेतले असून या सर्वांना कोरनटाईन करण्यात आले आहे, असे असतानाच आज दुपारी पुन्हा एकदा इंदापूरकर यांच्या चिंतेत भर पडणारी बातमी आली, नगरसेविकेच्या पतीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत, या रुग्णाचा शहरात दांडगा संपर्क असल्याने शहरात एकच खळबळ उडालेली आहे, मात्र घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी व शासनाने जे काही नियम दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे…