राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची स्थापना
शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार
राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची स्थापना
शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार
बारामती वार्तापत्र
केंद्र व राज्य सरकार च्या वतीने शेतकऱ्यांना दरवर्षी कृषी पुरस्कार दिले जातात मात्र या शेतकऱ्यांना तेवढा एक दिवस वगळता इतर वेळी कोणताही सन्मान मिळत नाही तसेच शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी प्रसार होण्यासाठी याचा वापर करत नाही राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी संघटित नाहीत जवळपास 13 शेतकरी पुरस्कार प्राप्त आहेत मात्र शेतकरी संघटनेत संघटित नसल्याने शासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेले विविध प्रयोग इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत शेतीविषयक प्रश्न राजकीय नेतृत्व मानते व बहुतेक त्याचा आणि वस्तुस्थितीचा समुंदर राहत नाही या व इतर येणाऱ्या अडचणी साठी शेतकऱ्यांचे संघटन महत्त्वाचे आहे त्यामुळे या संघाची स्थापना करण्यात आले आहे
ही संघटना बिगर राजकीय असून शासनाची संघर्ष न करता शासकीय कृषी योजना योग्य पद्धतीने राबवणे योजनेतील शेतकरी हितासाठी दुरुस्ती करणे नवीन योजना मंजूर करणे तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोचविणे साठी हा संघ काम करेल
शासनाच्या कृषी विषयक समित्यांवर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची मधून सदस्य घेणे तसा शासन निर्णय करणे व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना एसटी टोल माफी करणे कृषी मित्रा दर्जा देणे व केंद्र शासनाच्या वतीने ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषी पुरस्कार देण्यात यावेत यासाठी हा संघ प्रयत्न करणार आहे.
या संघाच्या अध्यक्षपदी ॲड प्रकाश भूता पाटील धुळे ,उपाध्यक्ष प्रल्हाद गुलाबराव वरे पुणे ,उपाध्यक्ष विजय अण्णाराम नरवाडे हिंगोली,सचिव संदीप नवले, पुणे स्त्री संचालिका संगीता हनुमंत भापकर पुणे, मायाबाई नारायण लांबट नागपूर ,संचालक ॲड बाळकृष्ण पोलाद पाटील जळगाव ,रामकृष्ण दगडू पाटील नंदुरबार ,सुरेश काशिनाथ कदम नाशिक, राजेंद्र चौधरी अहमदनगर ,प्रशांत भानुदास पाटील सांगली, राजेंद्र नानासाहेब गायकवाड सातारा ,राजकुमार बापू आडमुठे कोल्हापूर ,अमृत तुळशीराम मदनकर भंडारा, दिलीप बाबाजीराव देशमुख ठाणे,विनोद प्रभुदेसाई रत्नागिरी, प्रमोद राघोबा दळवी सिंधुदुर्ग ,विजय एकनाथराव चौधरी औरंगाबाद, दत्तात्रय भानुदास चव्हाण जालना, रमेश उत्तमराव शिरसाट बीड ,राजेंद्र मथुरादास मुंदडा उस्मानाबाद, प्रकाश जुजे पाटील लातूर, अंकुश राजाराम पडवळे सोलापूर ,राजेंद्र महादेव ताले, शशिकांत भास्करराव पुंडकर बुलढाणा, दिलीप नारायण फूके वाशिम ,हनुमंतराव जयवंतराव देशमुख यवतमाळ ,सदाशिव नाथा थोरात परभणी ,विजय मराठे नांदेड, कुंदन आनंदराव कळंबे अमरावती, दत्तात्रय गणपतराव गुडावर चंद्रपूर यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर प्रसिद्धी प्रमुख पदी सूर्यकांत नेटके अहमदनगर, आर के टेलर धुळे, विनोद इंगोले अकोला, धोंडोपंत रामराव कुलकर्णी लातूर यांची नेमणूक करण्यात आले आहे.