क्राईम रिपोर्ट

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – चार वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी केला जेरबंद

अभिजीत एकशिंगे यांना गोपनीय बातमी मिळाली होती

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – चार वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी केला जेरबंद

अभिजीत एकशिंगे यांना गोपनीय बातमी मिळाली होती.

क्राईम;बारामती वार्तापत्र

वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 333/2018 IPC 379,34 इतर प्रमाणे गुन्हा दाखल असुन पुणे ग्रामीण अभिलेखावरील यादी क्रमांक 276 गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे परसु सुहास पवार रा नंदन डेरीचे पाठीमागे नागतले ता बारामती , जि पुणे हा गुन्हा घडलेपासून फरार होता, तो आज रोजी वडगाव ते होळ रोडवर उभा असल्याची पो ना अभिजीत एकशिंगे यांना गोपनीय बातमी मिळाली होती त्याअनुषंगाने बातमी मिळताच पो स ई सिद पाटील सो यांनी तपास पथकासह सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपी परसु सुहास पवार वय 50 वर्षे रा नंदन डेअरीच्या पाठीमागे नगतले ता बारामती जि पुणे यास वैद्यकीय तपासणी करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही
मा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख सो, मा अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोसई अमित सिद पाटील
Asi अनिल काळे,Hc रविराज कोकरे,Pn अभिजीत एकशिंगे,Pn स्वप्नील अहीवले,Asi काशिनाथ राजपुरे यांनी केली आहे *

Check Also
Close
Back to top button