छत्रपती शिवरायांच्या कर्नाटकातील पुतळा विटंबना घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
छत्रपती शिवाजी महाराचांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला

छत्रपती शिवरायांच्या कर्नाटकातील पुतळा विटंबना घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
छत्रपती शिवाजी महाराचांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला
कर्नाटक न केंद्र सरकारने घटनेकडे गांभीर्यानं पहावं, दोषींना शोधून काढून कठोरात कठोर कारवाई करावी
शिवाजी महाराजांची थोरवी अशा घटनेनं कमी होणार नाही, अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही
– उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, प्रतिनिधी
“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे.
पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून मी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावं, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेनं जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.