राज्यातील या भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा,; पुढील 12 तास महत्त्वाचे,
बदलत्या वातावरणामुळं नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यातील या भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा,; पुढील 12 तास महत्त्वाचे,
बदलत्या वातावरणामुळं नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रतिनिधी
आग्नेय बंगालच्या उपसागरत निर्माण झालेलं आसानी चक्रीवादळ अंदमान- निकोबारमध्ये दाखल झालं आहे. हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळामुळं अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटला असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम जाणवतो आहे. मुंबईसह कोकणात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय.
23 तारखेपर्यंत मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून बदलत्या वातावरणामुळं नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे राज्यातील तापमान वाढत असल्याचं देखील सुरु आहे. बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवे मुळे आर्द्रता वाढल्यानं काही भागात ढगाळ वातावण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, येणाऱ्या पुढील चार दिवस पर्यंत तापमान सामान्य राहील.
दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रात आज ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी बंगालच्या उपसागरात मासेमारी करणाऱ्या जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.