राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
विशेष म्हणजे, भाजपचा आज पक्ष स्थापन दिवस आहे.
राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
विशेष म्हणजे, भाजपचा आज पक्ष स्थापन दिवस आहे.
नवी दिल्ली :प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटं चर्चा झाली. दरम्यान, राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना शरद पवारांनी त्यांच्या घरी स्नेहभोजनाला बोलावले होते. त्यावेळी भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यानंतर आज पवार आणि मोदी यांच्यात भेट झाल्याने या घटनेचे राजकीय महत्त्व वाढले आहे.
काल गडकरी पवारांना भेटले अन् आज पवार मोदींना : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी (दि. ५ ) महाराष्ट्रातील आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवारांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. त्यानंतर आज लगेचच पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने या घटनेचे राजकीय अर्थ निघत आहेत.
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई, अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तींयावरही ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी सत्तेत आली. पण गेल्या काही दिवसात महाविकास आघाडी आणि भाजपची आरपारची लढाई सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.