राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र ,अहमदनगर जिल्हारुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; 11 जणांचा मृत्यू
मृत्यूमुखी पडलेले सर्वजण 60 ते 70 वयोगटातील असल्याची माहिती आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र ,अहमदनगर जिल्हारुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; 11 जणांचा मृत्यू
मृत्यूमुखी पडलेले सर्वजण 60 ते 70 वयोगटातील असल्याची माहिती आहे.
प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये या ठिकाणी असलेल्या सतरा रुग्णांपैकी यातील किमान 11 रुग्ण हे दगावले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी दहा मृत्यू झाल्याला पुष्टी दिली आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती आहे. सूत्रांच्या माहिती नुसार 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आयसीयू वार्डात 17 कोरोना रुग्ण होते.
ही आग कशामुळे लागली याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही अद्यापर्यंत माहिती दिलेली नाही. आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे. ही आग पूर्णपणे वीजवण्यात आली असून या आयसीयू कक्षात असलेले सतरा रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.
घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, इतर पोलीस वरिष्ठ अधिकारी, शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स अधिकारी त्या ठिकाणी हजर असून जखमी झालेल्या रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत ही आग का लागली आणि किती रुग्णांचा मृत्यू झाला आणि असेल तर याला जबाबदार कोण याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहावयास मिळत आहे.
या आगीस आणि मृत्यूस जबाबदार अधिकरी, डॉक्टर, महानगरपालिका ऑडिट तापसणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कोरोनाची तिसरी लाट ही डिसेंबर अखेर तोंडावर सांगितली जात असताना जिल्हा रुग्णालयात आयसीयूला आग लागणे हे गंभीर असल्याचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले.