शैक्षणिक
राज्यातील शिक्षण विभागाकडून पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरु करण्यासंदर्भातील हालचाली सुरु
टास्क फोर्स यांच्याशी चर्चा झाल्यानंत अंतिम निर्णय घेऊ
राज्यातील शिक्षण विभागाकडून पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरु करण्यासंदर्भातील हालचाली सुरु
टास्क फोर्स यांच्याशी चर्चा झाल्यानंत अंतिम निर्णय घेऊ
प्रतिनिधी
राज्यातील शिक्षण विभागाकडून पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरु करण्यासंदर्भातील हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. पहिलीपासून शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याच्या हालचाली
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारनं टप्प्याटप्यानं शाळा सुरु केल्या आहेत. आता कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं आघाडी घेतली आहे. त्यामुळे पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षण विभाग पहिलीपासून वर्ग सुरु करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ शकतो, असं कळतंय.