स्थानिक

संजय गांधी निराधार योजनेची 79 प्रकरणे मंजूर

सभेमध्ये एकूण 95 अर्जाची छाननी करण्यात आली.

संजय गांधी निराधार योजनेची 79 प्रकरणे मंजूर

सभेमध्ये एकूण 95 अर्जाची छाननी करण्यात आली.

बारामती वार्तापत्र

संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा 29 जानेवारी 2021 रोजी तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले , शासकीय सदस्य व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडली .

सभेमध्ये एकूण 95 अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेचे 53 प्राप्त अर्जापैकी 49 मंजूर तर 04 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 36 प्राप्त अर्जापैकी 24 अर्ज मंजूर तर 12 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्‍त 01 अर्जापैकी 01 अर्ज मंजूर करण्‍यात आला.राष्ट्रीय कुटूंब योजनेचे 05 प्राप्त अर्जापैकी 05 अर्ज मंजूर करण्यात आले.

Back to top button