राज्यात दारूच्या दरामध्ये झाली तब्बल 50 टक्के कपात, असे आहे नवे दर!
सध्या एकूण 8 प्रकारच्या दारूच्या दरात कपात करण्यात आली आहे.
राज्यात दारूच्या दरामध्ये झाली तब्बल 50 टक्के कपात, असे आहे नवे दर!
सध्या एकूण 8 प्रकारच्या दारूच्या दरात कपात करण्यात आली आहे.
प्रतिनिधी
राज्यात आयात करण्यात येणारे परदेशी दारूच्या दरामध्ये तब्बल 50 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण, या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची तळीराम चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेरीस उत्पादन शुल्क विभागाने नवे दर जाहीर केले आहे.
राज्यात आयात करणाऱ्या दारूवर उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने 18 नोव्हेंबर रोजी घेतला होता. राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार, आजपासून हे दर कमी करण्यात आले आहे. आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहे.
या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे. त्यामुळे आता राज्यात आधी महाग असलेले विदेश मद्य आता कमी दरात मिळणार आहे. सध्या एकूण 8 प्रकारच्या दारूच्या दरात कपात करण्यात आली आहे. इतर कंपन्याही आपले दर लवकरच जाहीर करतील.
नवीन दरानुसार, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की ही आधी ५७६० रुपयांना मिळत होती. आता नवीन दरानुसार ३७५० रुपयांना मिळणार आहे.