राज्यात ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त होणार? बद्दल अजित पवारांचे रोखठोक उत्तर
'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा करमुक्त करावा अशी मागणी आजही भाजप आमदारांनी लावून धरली
राज्यात ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त होणार? बद्दल अजित पवारांचे रोखठोक उत्तर
‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा करमुक्त करावा अशी मागणी आजही भाजप आमदारांनी लावून धरली
मुंबई:प्रतिनिधी
‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमा राज्य करत आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
गुजरात, हरियाणा आणि मध्यप्रदेश राज्यात हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रतही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द काश्मीर फाईल्सवर आज विधानसभेत भाष्य करून भाजपची कोंडी केली. मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाईल’ सिनेमाचा उल्लेख केला त्यामुळे केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच लागू होईल.
अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असं अजित पवार सांगत असातनाच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र अजित पवार यांचे बोलणे झाल्याशिवाय बोलायला दिले जाणार नाही, अशी भूमिका तालिका अध्यक्षांनी घेतल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनी ‘पळाले रे पळाले’ म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ … ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या.