राजकीय

बारामती नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग — अजित पवार गटाच्या नगराध्यक्षांच्या सभेनंतर अपक्ष उमेदवाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पक्षाची मोठी कोंडी सुटल्याचे मानले जात

बारामती नगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग — अजित पवार गटाच्या नगराध्यक्षांच्या सभेनंतर अपक्ष उमेदवाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पक्षाची मोठी कोंडी सुटल्याचे मानले जात

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 चा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून, या पार्श्वभूमीवर शहरात महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल अजित पवार गटाच्या नगराध्यक्षांनी घेतलेल्या गाजलेल्या सभेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, या सभेच्या काही तासांतच एक मोठा राजकीय बदल समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्रीकांत जाधव यांच्या पत्नी, दिपाली श्रीकांत जाधव, यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मंगल शिवाजीराव जगताप यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी कोंडी सुटल्याचे मानले जात असून,बारामतीतील निवडणुकीत हा एक महत्त्वाचा कलाटणीबिंदू मानला जात आहे.

दिपाली जाधव यांनी प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष उमेदवार म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु बदलत्या राजकीय समीकरणांचा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांनी अखेर आपला निर्णय बदलला. एका अधिकृत पत्राद्वारे त्यांनी म्हटले आहे:

बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मी प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून आणि प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मंगल शिवाजीराव जगताप यांना माझा निर्विवाद पाठिंबा जाहीर करते.”तसेच त्यांनी प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की,आपले महत्त्वाचे मत ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा.”या निर्णयामुळे प्रभाग १६ मधील निवडणूक अधिक चुरशीची होणार असून,राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण फिरण्याची चिन्हे दिसत आहेत. बारामती नगरपरिषदेतील निवडणूक प्रचारात या घडामोडींचा महत्त्वपूर्ण परिणाम होणार,असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Back to top button