टेक्निकलच्या विद्यार्थांना निर्भया पथकाचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.उर्मिला भोसले यांनी केले.

टेक्निकलच्या विद्यार्थांना निर्भया पथकाचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.उर्मिला भोसले यांनी केले.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज येथे बुधवार दि 13/4/2022 रोजी निर्भया पथकाच्या प्रमुख सौ.अमृता भोईटे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थी जीवनात सहवासाचे महत्व,मोबाइल शाप की वरदान,शालेय शिस्त, वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना कशी करावी या सर्व गोष्टींचे एक मित्र,मार्गदर्शक, तत्वज्ञ या भावनेतून त्यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे होते.सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रमेश जाधव,जेष्ठ शिक्षिका सौ.जयश्री हिवरकर,सौ.गायकवाड मॅडम व सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.उर्मिला भोसले यांनी केले.