राज्य विद्यार्थी वाहतूकदार कृती समितीची स्थापना
राज्यभरातून पदाधिकारी बारामतीत उपस्थित
बारामती वार्तापत्र
मागील आठ – नऊ महिन्यापासून कोरोणाच्या महामारीत देशात आणि राज्यात लॉकडाउन होते.त्यामुळे शाळांनाही सुट्ट्या होत्या. विद्यार्थी वाहतूक करणार्या सामान्य माणसांचा उदरनिर्वाहाचे साधनच बंद होते. मात्र शासनाला द्याव्या लागणाऱ्या सर्व कर टॅक्स, मंजुऱ्या यामध्ये खंड पडला नाही व या व्यवसायीकांचा प्रश्न जटील बनला आहे.
वाहतूकदारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, इन्शुरन्स मुदतवाढ मिळावी ,टॅक्स माफी व्हावी तसेच फायनान्स कंपन्यांकडून कर्ज, व्याज वसुलीसाठी मानसिक छळ होत आहे.यासह विविध प्रश्नांबाबत शासनाला वेळोवेळी ननिवेदने देण्यात आली होती. मात्र त्यावर शासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही.
सर्व प्रश्नांसाठी राज्यभरातून एकत्रित आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूकदार कृती समितीची स्थापना करण्यात आली. नुकतीच या कृती समितीची पहिली बैठक बारामती येथे शासकीय विश्राम गृह मध्ये झाली असून या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शासनाकडे चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा समितीमार्फत लढा देण्यात येईल. अशी माहिती या कृती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपोषण सम्राट व सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी दिली.
यावेळी ( सर्व संघ ) महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ, भगवे वादळ वाहतूक महासंघ ,बारामती वाहतुक संघ, परिवर्तन वाहतूक संघ नवी मुंबई, पनवेल विद्यार्थी वाहतूक, रायगड विद्यार्थी वाहतूक, महाड विद्यार्थी वाहतूक, अमरावती विद्यार्थी वाहतूक , शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक ,जय संघर्ष विद्यार्थी वाहतूक संघ, लातूर विद्यार्थी वाहतूक, अकलूज, इंदापूर ,पुणे, पिंपरी-चिंचवड ,उस्मानाबाद, नगर, सातारा, शिरवळ ,लोणंद ,खंडाळा, खोपोली इत्यादी ठिकाणच्या सर्व वाहतूक संघटना व संघ यांचे पदाधिकारी उपस्थित होते
या समितीमध्ये उपस्थित संघटनेने आपले सदस्य नियुक्त केले व इतरही अनुपस्थित जिल्हा सदस्यांची सुद्धा नियुक्ती करणारे येणार आहे करण्यात येणार आहे या समितीमध्ये पांडुरंग हुमणे, तानाजी बांदल, संतोष जाधव, योगेश बोऱ्हाडे ,मारुती सावंत, संतोष गोळे ,महादेव कुलकर्णी, रवींद्र गुल्हाने, गणेश बोराटे ,लक्ष्मण वाघे ,राहुल इंगळे ,शंकर अमंते, अरविंद भाकरे, राजेश भगत इत्यादींचा समावेश करण्यात आला.
शासनाचे लक्ष वेधून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी बारामती विद्यार्थी वाहतूक संघटनेने पुढाकार घेत कार्यक्रम केला यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर राजेश भगत यांनी आभार मानले.