बारामती मध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात युवक काँग्रेस कडून केंद्र सरकारचा निषेध
केंद सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी

बारामती मध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात युवक काँग्रेस कडून केंद्र सरकारचा निषेध
केंद सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी
बारामती वार्तापत्र
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात बारामतीत काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली.यावेळी दरवाढीचा निषेध करण्यात आलाय.. कार्यकर्त्यांनी शहरातून सायकल चालवत मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलीय. ‘पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देत सरकारकडून करण्यात आलेल्या डिझेल पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश मोरे ,तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, शहराध्यक्ष अशोक भाऊ इंगोले ,युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव बुरुंगले, डॉक्टर विजय भिसे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष आकाश पांडे, राहुल वाबळे,शिवाजीराव काकडे, विपुल तावरे, सुशांत सोनवणे, सिद्धेश गवळी ,रमेश इंगोले, भारत रामचंद्र,यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.