शैक्षणिक

अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) मध्ये Intaglio Series 2025 चे आयोजन

१४ व शनिवार दि १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी करण्यात आले

अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (AIMS) मध्ये Intaglio Series 2025 चे आयोजन

१४ व शनिवार दि १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी करण्यात आले

बारामती वार्तापत्र

बारामती परिसरातील MBA साठी विद्यार्थ्यांच्या पसंतीचे एकमेव ठिकाण म्हणून नावलौकिक असणारी AIMS ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाशी स्थायी स्वरूपात संलग्नित व नॅक मानांकित आहे.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
मध्ये सालाबादप्रमाणे Intaglio Series २०२५ या आंतरमहाविद्यालयीन मॅनेजमेंट फेस्ट चे आयोजन शुक्रवार दि १४ व शनिवार दि १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी करण्यात आले आहे.
बारामती व परिसरातील विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्य विकासाला वाव देण्यासाठी व त्यांच्यातील वक्तृत्व, व्यक्तिमत्व विकास, सभाधीटपणा, संभाषण कौशल्य, इत्यादी ची जोपासना करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
येते.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ दि १४ फेब्रुवारी रोजी डॉ. भरत शिंदे, प्राचार्य, व्ही. पी. आर्ट्स कॉमर्स  सायन्स कॉलेज, शोडेन गोपेर्मा, ट्रेनींग अँड
प्लेसमेंट ऑफिसर, PIBM, पुणे व माजी विद्यार्थी श्री. विराज उदय पोतदार ब्रँच ऑपेरेशन मॅनेजर, आर. बी. एल. बँक पुणे, तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. जवाहर शहा (वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शहा
(वाघोलीकर), व अनेकांत इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे सचिव डॉ. हर्षवर्धन व्होरा व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. महावीर संघवी व आदित्य शहा (पंदारकर) यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. एम. ए. लाहोरी व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.सचिन जाधव यांनी केले आहे.
Back to top button