राधेश्याम एन.आगरवाल’च्या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती साठी निवड
शहरी व ग्रामीण मिळून १५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

राधेश्याम एन.आगरवाल’च्या विद्यार्थिनीची शिष्यवृत्ती साठी निवड
शहरी व ग्रामीण मिळून १५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
बारामती वार्तापत्र
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या वतीने घेतलेल्या रयत प्रज्ञा शोध परीक्षेद्वारे राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. कु.संस्कृती नितीन दळवे हिने 200 पैकी 158 गुण मिळवून मुलाखतीसाठी पात्र झाली आहे.मुलाखत पात्र विद्यार्थांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
दरवर्षी कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. शहरी व ग्रामीण मिळून १५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील २ वर्ष एक हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
सर्व यशस्वी विद्यार्थी व विभागप्रमुख विकास जाधव व विषयशिक्षक सौ.मनिषा रूपनवर ,पूनम गायकवाड, फरनाज पठाण,निलेश गायकवाड,रुपाली तावरे,लालासाहेब आडके, नाजनिन शेख यांचे अभिनंदन शाळा समितीचे सदस्य सदाशिव सातव, विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कल्याण देवडे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.