शैक्षणिक

राधेश्याम एन.आगरवाल’च्या विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील २ वर्ष एक हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

राधेश्याम एन.आगरवाल’च्या विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील २ वर्ष एक हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या वतीने घेतलेल्या रयत प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल विद्यालयाच्या दोन विद्यार्थांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

शौर्य राजेश जाधव याने 200 पैकी 158 गुण मिळवले तर कु.अनुष्का दत्तात्रय आटोळे हिने 144 गुण मिळवून मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत.मुलाखत पात्र विद्यार्थांची मुलाखतीनंतर शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दरवर्षी कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

शहरी व ग्रामीण मिळून १५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.त्यामध्ये शहरी विभागातून यांची निवड झाली आहे. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील २ वर्ष एक हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

सर्व यशस्वी विद्यार्थी व विभागप्रमुख विकास जाधव व विषयशिक्षक सौ.मनिषा रूपनवर ,सौ.पूनम गायकवाड, सौ.शुभांगी दिवेकर,निलेश गायकवाड,श्री सुधीर म्हेत्रे यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सदाशिव सातव, विद्यालयाचे प्राचार्य भगवान भिसे,उपमुख्याध्यापक श्री सतीश पाचपुते,पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Back to top button