राधेश्याम एन आगरवाल विद्यालयात क्रीडा महोत्सव
स्पर्धा इ ५ वी ते ७ वी व इ ८ वी ते1१० वी अश्या दोन गटात घेतल्या जाणार
राधेश्याम एन आगरवाल विद्यालयात क्रीडा महोत्सव
स्पर्धा इ ५ वी ते ७ वी व इ ८ वी ते1१० वी अश्या दोन गटात घेतल्या जाणार
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धा इ ५ वी ते ७ वी व इ ८ वी ते1१० वी अश्या दोन गटात घेतल्या जाणार आहेत.या स्पर्धेत खो – खो,कबड्डी, हॉलिबॉल ,मिनी मॅरेथॉन अश्या खेळांचा समावेश असणार आहे.
आज या स्पर्धेचे उद्घाटन ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री आनंदराव करे,ज्येष्ठ शिक्षक श्री प्रदीप पळसे,जयश्री हीवरकर,अविनाश कोकरे,मोहन ओमासे,शशिकांत फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह होता.
खेळाच्या माध्यमातून विद्यार्थांचा शारीरिक विकास होतो.तसेच त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री कल्याण देवडे यांनी मांडले.या स्पर्धांचे नियोजन क्रीडा विभागप्रमुख श्री सुदाम गायकवाड,लालासाहेब आडके,विकास जाधव तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी केले.