
रामनवमी निमित्त श्रीराम नगर येथे विविध कार्यक्रम संपन्न
पंचक्रोशितील रामभक्त मोठ्या संखेने
बारामती वार्तापत्र
श्रीराम नगर, भिगवण रोड येथील के. भगवानराव तावरे यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्सहात साजरा करण्यात आला.
गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर सुरू झालेल्या या उत्सवा अंतर्गत संगीत तुलशी रामायण, भजन, किर्तन, हरीपाठ, जागर, भारूड, काकडा, महापूजा, होम हवन, श्रीराम नाम सप्ताह, श्रीराम जन्मोत्सव सोहळा तसेच जन्मोसवाच्या दिवशी पालखीचे आयोजन या वेळी शेकडो भाविक भक्त सामील झाले होते.
श्रीराम नवमी दिवशी श्रीराम जन्माचे किर्तन ह भ प कृष्ण महाराज मेहुणकर यांचे झाले .
मंदिरात दर्शनासाठी श्रीराम नगर बारामती पंचक्रोशितील रामभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.