इंदापूर

रायगड जिल्हा परिषद चरई खुर्द या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा विविध स्पर्धा साहित्य व खाऊ वाटप

घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

रायगड जिल्हा परिषद चरई खुर्द या शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा विविध स्पर्धा साहित्य व खाऊ वाटप

घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

इंदापूर; प्रतिनिधि

जिल्हा परिषद चरई खुर्द शाळेत शुक्रवारी (ता. १५) ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विश्वदीप शिंदे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले.

यावेळी ध्वजारोहण चरई खुर्द शाळेच्या मुख्यध्यापिका भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

यामध्ये सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, पानाफुलांची सजावट, वक्तृत्व, विविध खेळ, बडबड गीते गायन, कथाकथन इत्यादी स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविले. तसेच राधाकृष्ण मंडळ चरई खुर्द यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांना ट्रॉफी व कंपासपेटी देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास लिंदे, बौद्धजन सेवा संघ चरई संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे, जयवंत शिंदे,मोहन मोरे, दामोदर शिंदे, शालेय समितीच्या अध्यक्षा निशिगंधा महाडिक,आशा सेविका मानसी तांबे, कुंदा बंडागळे, मदतनीस नंदा ओमले, विमल शिंदे, सुमन शिंदे, कल्पना शिंदे, रोशनी भालेराव, आशा मोहिते, आशा गायकवाड, सुचिता तांबे, सुप्रिया शिंदे, अरुणा जाधव,सुनील दळवी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार चरई शाळेच्या शिक्षिका अल्का कंधारे यांनी मानले.

Related Articles

Back to top button