राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ज्ञानसागर च्या विद्यार्थीची शानदार मानवंदना
संपूर्ण जिल्ह्यातून ५६ स्काऊट, ५६ गाईड यांची निवड

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ज्ञानसागर च्या विद्यार्थीची शानदार मानवंदना
संपूर्ण जिल्ह्यातून ५६ स्काऊट, ५६ गाईड यांची निवड
बारामती वार्तापत्र
उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथे दि.२१ नोव्हेबर ते २८ नोव्हेबर २०२५ दरम्यान १९ वे राष्ट्रीय जांबोरी आणि ग्रँड फायनल डायमंड ज्युबली स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय जांबोरीत संपूर्ण देशभरातून २७ राज्य, ४ देशातील विद्यार्थी व शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या जांबोरीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून ५६ स्काऊट, ५६ गाईड यांची निवड करण्यात आली होती.
यामध्ये सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे १६ विद्यार्थी सहभागी होते. या राष्ट्रीय स्काऊट जांबोरी संचलन, शोभायात्रा, ग्रुप डान्स, फुड प्रदर्शन, कलर पार्टी परेड अशा विविध स्पर्धा झाल्या.
यामध्ये कलर पार्टी परेडचे ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सांगता समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित भारताचे महामाहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना मानवंदना देते उत्कृष्ट सादरीकरण केले.
यामध्ये विरांजली खोमणे, स्वरांजली डोईफोडे, समृद्धी चांदगुडे, कार्तिकी झगडे, काव्या मजगर , अनुष्का कदम, साई धालपे, राजनंदिनी भिसे, रणवीर काळे, यश अडके, ओमराज पाटील, राजीव वाडकर, ओम ढोबळे, संकेत जावरे, श्रेयश ठोंबरे, यश खटके राष्ट्रीय स्काऊट जांबोरी स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे १६ विद्यार्थी सहभागी होते.
सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेत १० वाढीव गुण मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रिडा शिक्षक बाबुराव चव्हाण व सुहास चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय स्काऊट जांबोरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ज्ञानसागर गुरुकुलच्या १६ विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यामध्ये या शाळेचे, विद्यार्थ्यांचे व अध्यक्ष प्रा. सागर आटोळे व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
फोटो ओळ:
मानवंदना पथकामध्ये सहभागी झालेले ज्ञानसागरचे विद्यार्थी






