राजकीय

अजित पवार बारातमीमधून पराभूत?’, उत्तम जानकरांनी EVM चे गणित मांडत थेट आकडेवारीच दिली

20 हजार मतांनी पराभव

अजित पवार बारातमीमधून पराभूत?‘, उत्तम जानकरांनी EVM चे गणित मांडत थेट आकडेवारीच दिली

20 हजार मतांनी पराभव

बारामती वार्तापत्र

राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली. यंदाची निवडणूक ही महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती.

राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. मात्र प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर महायुतीचा एकतर्फी विजय झाला. यामुळे राज्यामध्ये अगदी विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याएवढ्या जागा देखील महाविकास आघाजीच्या कोणत्या घटक पक्षाकडे नव्हते. मात्र ईव्हीएममध्ये घोळ घालून हा विजय मिळवला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यानंतर आता आमदार उत्तम जानकर यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी यापूर्वी देखील निकालावर संशय घेतला होता. तसेच त्यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. यानंतर आता उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या निकालावर संशय घेतला असून अजित पवार हे देखील पराभूत झाल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले उत्तम जानकर?

माध्यमांशी संवाद साधून आमदार उत्तम जानकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. उत्तम जानकर म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये गडबड झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी जवळपास 150 मतदारसंघामध्ये ही गडबड झाली आहे. याची प्रक्रिया राहुल गांधी, शरद पवार आणि निवडणूक आयोग यांच्या लक्षात आणून देणार आहे. ईव्हीएमच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड होत आहे. व्हीव्हीपॅटमधून जी पावती बाहेर येते, ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकली जावी,” अशी मागणी आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे.

पुढे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठी गडबड झाली आहे. याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते. अजित पवार यांना एक लाख 80 हजार मते मिळालेली आहेत. त्यापैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांना 80 हजार अधिक 60 अशी एक लाख 40 हजार मते मिळालेली असून अजित पवारांना केवळ 1 लाख 20 हजार मते उरतात,” असा मोठा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळाले आहे. मात्र त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. उत्तम जानकर पुढे म्हणाले की, “अजित पवार गटाचे केवळ 12 आमदार निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे केवळ 18 आमदार निवडून आलेले आहेत. तर भाजपाचे केवळ 77 आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीची एकूण संख्या 107 एवढी होते, दोन-तीन अपक्ष मिळून ते 110 पर्यंतच पोहोचतात. याबाबत मी सर्व मतदारासंघाचा बारकाईने अभ्यास केला” असल्याचेही मत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!