राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकरा वर्षानंतर माळेगाव कारखान्यात ठेवले पाऊल ; संचालकांशी साधला संवाद
माळेगावचे विस्तारिकरण झाल्याने १९० कोटींचे कर्ज दोन वर्षांपुर्वी कारखान्यावर होते, ते आता ११० कोटींपर्यंत खाली आणले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकरा वर्षानंतर माळेगाव कारखान्यात ठेवले पाऊल ; संचालकांशी साधला संवाद
माळेगावचे विस्तारिकरण झाल्याने १९० कोटींचे कर्ज दोन वर्षांपुर्वी कारखान्यावर होते, ते आता ११० कोटींपर्यंत खाली आणले आहे.
बारामती वार्तापत्र
आज अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संचालकांच्या विनंतीवरुन माळेगाव कारखान्यास भेट दिली व कामकाजाची पाहणी केली तसेच संचालक मंडळाकडून सर्व कामकाजाची माहिती घेतली साखर उद्योगातील विविध घडामोडींच्या संदर्भात त्यांनी संचालक संचालक मंडळाशी संवाद साधला.
राज्यात तांदूळ, मक्यापासून इथेनाॅल निर्मिती होत आहे. तशीच विजेची स्थिती आहे. त्यामुळे आगामी काळातील या धंद्यातील स्पर्धा विचारात घेता माळेगावसह सर्वच साखर कारखान्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. माळेगावने १२ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पुर्ण करत १५ लाख टनाचे टार्गेट ठेवल्याबद्दल पवार यांनी यावेळी आर्वजून प्रशासनाचे कौतूक केले.
दरम्यान, आपल्याकडील कारखांदारांना इथेनाॅल स्पलायसाठी जवळचे आॅइल डेपो मिळत नाहीत आणि इतर राज्यात स्पलाय करायचे असल्यास वाहतूक खर्च परवडत नाही. परिणामी केंद्र सरकारच्या अपेक्षेनुसार इथेनाॅल पेट्रोलमध्ये वापरले जात नाही. त्यासाठी देशात ऊस उत्पादन न होणाऱ्या भागामध्ये इथेनाॅल पुरवठा करण्याचे काम कारखान्यांऐवजी आॅइल कंपन्यांनी केल्यास सर्व ठिकाणी इथेनाॅल पुरवठा होऊ शकतो.
माळेगाव कारखान्यावर अपवाद वगळता राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वास्तव्यही माळेगाव
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे माळेगाव कारखाना आणि शरद पवार यांच्यातील ऋणानुबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत.
२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत माळेगाव कारखान्यांवरील राष्ट्रवादीची संपुष्टात आली आणि चंद्रराव तावरे यांच्याकडे सत्तासूत्रे गेली. तत्पूर्वी माळेगाव कारखाना ऊसदराच्या आंदोलनांमुळे चर्चेत राहिला.
त्यावेळी संपूर्ण पाच वर्षात शरद पवार तिकडे फिरकले नव्हते. माळेगाव कारखान्याची शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अभियांत्रिकी कॉलेजचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. मध्यंतरीच्या काळात रंजन तावरे हे कारखान्याचे अध्यक्ष असताना शरद पवार यांनी या संस्थेच्या बैठकीला हजेरी लावली होती.
त्यामुळे तब्बल ११ वर्षे शरद पवार यांनी माळेगाव कारखान्यावर एकदाही भेट दिली नव्हती. परिणामी शरद पवार यांना सत्ता आल्यानंतरच सन्मानाने पुन्हा कारखान्यावर आणायचे असा चंग राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांधला होता.
यावेळी संचालक केशवराव जगताप, गुलाबराव देवकाते, तानाजी कोकरे, संगिता कोकरे, स्वप्नील जगताप, सागर जाधव, मंगेश जगताप, प्रताप आटोळे, संजय काटे, प्रमोद खलाटे, तानाजी पोंदकुले उपस्थित होते.