
इंदापूरातील कत्तलखान्यावर पोलिसांची मोठी कारवाई
तिघांना घेतले ताब्यात
बारामती वार्तापत्र
इंदापूर शहरातील कुरेशी गल्ली येथे गेल्या पंधरवड्यात पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केल्यानंतर दि.४ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून इंदापूर पोलिसांनी पुन्हा धाड टाकली यामध्ये संकरीत गायीची ३० नर वासरे, सात संकरीत गाई,पाऊण टन गोवंश मांस असा एकूण दहा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक निरीक्षक लातूरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा सुरेश मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल जमादार, पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे, पो.कॉ भालसिंग, पो.कॉ नवले, पो.कॉ गुरव, पो.कॉ वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
यावेळी अन्नपाण्याविना क्रूरतेने डांबून ठेवलेली जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. याच दरम्यान या ठिकाणी असलेल्या आक्रम रशित कुरेशी १९ राहणार कुरेशी गल्ली) तौफिक निसार मुलानी (वय २८ वर्षे, राहणार कुरेशी गल्ली) आलिम खय्युम कुरेशी (वय ३२ वर्षे, राहणार कुरेशी गल्ली) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनेही ताब्यात घेण्यात आली. यामध्ये पांढरा रंगाचा महिंद्रा पिकअप, विटकरी रंगाचा आयशर टेम्पो, पांढर्या रंगाचा बोलेरो पिकअप तसेच दोन मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम चे कलम ५अ,५ब, ५क, ९ व पशु क्रूरता अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे कारवाई केली आहे. फौजदार सीमा सुरेश मुंढे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.