मुंबई

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे : कोर्ट

ईडीनं दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर मनीलॉड्रिंग केल्याचे मत केले व्यक्त

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे : कोर्ट

ईडीनं दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर मनीलॉड्रिंग केल्याचे मत केले व्यक्त

मुंबई, प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात आता नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसून येत आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये नवाब मलिक यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कोर्टाने सुद्धा मलिकांचे डी गँगसोबत संबंध असल्याचं सकृतदर्शनी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.

आता याप्रकरणी सुरू होणाऱ्या खटल्यात आरोपनिश्चिती केली जाईल. जर नवाब मलिकांनी त्यांच्या विरोधातले आरोप फेटाळले तर मग ते कसे निर्दोष आहेत? हे त्यांच्या वकिलांना खटल्या दरम्यान कोर्टाला आपल्या युक्तिवादातून पटवून द्यावं लागेल.

विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आपल्या चार्जशिटमध्ये 17 जणांना साक्षीदार केलं आहे. या दोषारोपपत्राची दखल घेत स्पेशल कोर्टाने नवाब मलिक आणि 1993 बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाहवली खान या दोघांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram