
जगात भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ : हनुमंत कोकाटे
इंदापुरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
इंदापूर : प्रतिनिधी
संपूर्ण जगात भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ व आदर्शवत आहे.विषमता काढून टाकण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे,याचा सर्व भारतीयांना निश्चितपणे अभिमान आहे,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी शुक्रवारी (दि.२६) येथे बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील संविधान स्तंभाजवळ संविधान दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी कोकाटे बोलत होते.या वेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याची शपथ घेतली.
कोकाटे म्हणाले की,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन देशामध्ये समता व समानता प्रस्थापित करण्याचे खूप मोठे ऐतिहासिक काम केले आहे.
यावेळी अतुल झगडे,बाळासाहेब ढवळे, रमेश पाटील,सचिन खामगळ, दत्तात्रय मोरे,नवनाथ रुपनवर, सुधीर मखरे,दिलीप वाघमारे, सुभाष खरे,स्वप्निल राऊत,इम्रान शेख,सुभाष डरंगे,अनिकेत वाघ,स्वप्निल मखरे,दादासाहेब सोनवणे,श्रीधर बाब्रस,महादेव लोखंडे,गोविंद पाडुळे, छाया पडसळकर, अश्विनी कुर्डे-राऊत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.