मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात,प्रकृती स्थिर

सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात,प्रकृती स्थिर

सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.

Related Articles

Back to top button