जेजुरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री;छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक…

महात्मा फुले ही पदवी जनतेने दिलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री;छगन भुजबळ थोडक्यात बचावले, हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक…

महात्मा फुले ही पदवी जनतेने दिलेली आहे.

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरता थेट कार पार्किंगमध्ये लँड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे मंत्री भुजबळ क्षणभर धोक्यात आले, मात्र सुदैवाने कोणतीही अपघात झाला नाही.

मोठी खळबळ

खानवडीतील जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भुजबळ हे नाशिकहून पुण्याच्या दिशेने येत असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या पायलटने हेलिपॅडऐवजी शाळेजवळील पार्किंग क्षेत्रात हेलिकॉप्टर उतरवलं. कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये या प्रकाराने मोठी खळबळ उडाली.

सुदैवाने मंत्री सुरक्षित आहेत, पण पायलटच्या या गंभीर चुकेची चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

कार्यक्रमात बोलताना भुजबळ काय म्हणाले?

कार्यक्रमात बोलताना भुजबळ म्हणाले, “खानवडीमध्ये एक चांगली शाळा निर्माण करून आज त्याची सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देते.” त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी साजरी करण्याची घोषणा केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

भुजबळ म्हणाले, “लोकसभेतील सर्व नेत्यांनी महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली. महात्मा फुले ही पदवी जनतेने दिलेली आहे. त्यांच्याविषयी अनेक पुस्तके लिहिली गेली, पण जन्मतारीख नव्हती. हरी नरके यांनी सत्यशोधक समाजासंबंधीचे पुस्तक शोधून त्यात जन्मतारीख सापडली.”

ते पुढे म्हणाले, “जिल्हा परिषद शाळा चांगली केल्याने खानवडी आता सामाजिक परिवर्तन केंद्र बनले आहे. महात्मा फुले ब्राह्मणवादी होते, असा प्रचार केला जातो, पण ते ब्राह्मणविरोधी नव्हते. त्यांचे अनेक ब्राह्मण मित्र होते, जसे भिडे, वाळवेकर.”

Back to top button