कोरोंना विशेष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची कोरोनावर मात

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची कोरोनावर मात

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई, प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP president) अध्यक्ष शरद पवार यांना  कोरोनाची (Corona) लागण झाली होती. पण अवघ्या सात दिवसांत शरद पवार यांनी कोरोनावर  मात केली आहे. खुद्द शरद पवार यांनीची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना २४ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आपल्या संपर्कात असलेल्या लोकांनी टेस्ट करुन घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच पवारांनी उपचार घेतले होते. अखेर उपचाराअंती पवारांनी कोरोनावर मात केली आहे. खुद्द पवार यांनी ट्वीट करून कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली.

माझी Covid-19 RT-PCR चाचणी करण्यात आली असता आज रिपोर्ट निगेटिव्ह आहे. माझ्या तब्येतीत लवकरात लवकर सुधार होण्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी मी माझे डॉक्टर, मित्र, सहकारी आणि हितचिंतकांचा आभारी आहे, असं पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button