राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठा अपघात ; थोडक्यात बचावले!

एसटीने कारला जोरदार धडक दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठा अपघात ; थोडक्यात बचावले!

एसटीने कारला जोरदार धडक दिली.

मुंबई,प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे. 

रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.

दरम्यान, या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आमदार जगताप यांना ओळखणारे अन्य वाहनांतील नागरिकही मदतीसाठी थांबले होते. एवढ्या मोठ्या अपघतातून सुखरुप बचावल्यानंतर जगताप पुढे मुंबईला गेले. सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तेथे भेटी गाठी आणि कामेही सुरू केली आहेत. जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram