क्राईम रिपोर्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारासल घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारासल घडली.

पुणे: बारामती वार्तापत्र रिपोर्ट

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे ( Anna Bansode) यांच्यावर गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात  कोणीही जखमी झालेलं नाही.

अण्णा बनसोडे गोळीबारातून वाचले

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी गोळीबार झाला. मात्र, या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारासल घडली.

अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार का झाला?

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही.

गोळीबारावर अण्णा बनसोडे काय म्हणाले?

अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लावं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येईल, असं अण्णा बनसोडे म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती आहे.

अण्णा बनसोडे कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापुर्वी ते 2009 मध्ये देखील निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!