राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार,महाराष्ट्रातील ‘हे’ चार खासदार संसदरत्न
याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार,महाराष्ट्रातील ‘हे’ चार खासदार संसदरत्न
याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत माहिती दिली.
नवी दिल्ली :प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार घोषित झाला आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत माहिती दिली. तसेच पहिली प्रतिक्रिया देत हा सन्मान आपल्या बारामती मतदारसंघातील प्रत्येकाचा असल्याची भावना व्यक्त केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार सलग सातव्यांदा घोषित झाला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना केलेल्या संसदीय कार्याची दखल घेतली गेली याचे समाधान आहे. हा सन्मान आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला संसदेत बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.”
यावेळी देशातल्या 11 खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे,राष्ट्रवादीच्या फौजिया खान,भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार असणार आहे.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न 2022 हा पुरस्कार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार हिना गावित आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांना देण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे.
अकरा जणांना पुरस्कार जाहीर
यंदा एकूण 11 जणांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ज्या अकरा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामधे महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील समावेश आहे.