राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षांच्या वक्तव्याने नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे येणार अडचणीत!….
इंदापुरच्या राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाच्या तालुकाध्यक्षांच वादग्रस्त वक्तव्य...! भर पत्रकार परिषदेत साहेब गटाच्या कार्याध्यक्षाला हाताखालून काढण्याचं केलं वादग्रस्त वक्तव्य...

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षांच्या वक्तव्याने नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे येणार अडचणीत!….
इंदापुरच्या राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाच्या तालुकाध्यक्षांच वादग्रस्त वक्तव्य…!
भर पत्रकार परिषदेत साहेब गटाच्या कार्याध्यक्षाला हाताखालून काढण्याचं केलं वादग्रस्त वक्तव्य…
इंदापूर; प्रतिनिधि
Anc: नुकतीच कृषी मंत्री पदाची माळ गळ्यात पडलेले वे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पहिल्याच दिवशी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आले होते….
यावर विरोधी पक्षाकडून टीकेची राळ उठवली जात असताना इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या कार्याध्य महारुद्र पाटील यांना हाताखालून काढण्याची भाषा वापरल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय…
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची मागणी केली होती…
आगोदरचे कृषी मंत्री धनंजय मुंडे अशाच कार्यकर्त्यांच्या कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना नव्या कृषी मंत्र्यांना देखील कार्यकर्ते अडचणीत आणतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे…