राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बारामती शहराध्यक्षपदी जय पाटील यांची फेरनिवड
पुढील दहा दिवसांत प्रभागनिहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहराध्यक्षपदी जय पाटील यांची फेरनिवड
पुढील दहा दिवसांत प्रभागनिहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहराध्यक्षपदी जय पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा जय पाटील यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते जय पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, माजी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, नवनियुक्त तालुकाध्यक्ष संदीप बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेल्या पार्श्वभूमीवर जय पाटील यांच्याकडे पुन्हा नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. शहराध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळातील चांगली कामगिरी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
शहरातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन कामकाज राबविणार असून, पुढील दहा दिवसांत प्रभागनिहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विकासाच्या कामांना गती देणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले.






