राष्ट्रवादी काँग्रेस ( SP) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी ॲड.राहुल मखरे
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करणार..
राष्ट्रवादी काँग्रेस ( SP) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी ॲड.राहुल मखरे
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करणार..
इंदापूर; प्रतिनिधी
इंदापूरातील एडवोकेट.राहुल मखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( SP) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी नियुक्ती झाली. ॲड.राहुल मखरे यांना नियुक्तीचे पत्र रविवार (दि.13) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते दिले. अॅड. राहुल मखरे यांनी मागील महिन्यात पुणे येथे हजारो कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाच्या वतीने त्यांना थेट राज्य पातळीवर सरचिटणीस व प्रवक्ता म्हणून काम करण्याची संधी दिली.
यावेळी बोलताना ॲड.राहुल मखरे म्हणाले, या नवीन जबाबदारीसह नव्या आव्हानांना पेलवत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न हे प्रदेश स्तरावरून सोडवण्यासाठी भर देणार आहे.