राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर यांच्या वतीने नवीन मतदार नोंदणी कक्षाचे उद्घाटन
स्वतंत्र कक्षाची व्यवस्था

राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर यांच्या वतीने नवीन मतदार नोंदणी कक्षाचे उद्घाटन
स्वतंत्र कक्षाची व्यवस्था
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील पेन्सिल चौक येथे पार पडले या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष सचिनशेठ सातव व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरणभाऊ इंगळे यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी नगरसेविका अनुप्रिया डांगे,धनश्री बांदल,नगरसेवक बिरजू मांढरे, नगरसेवक प्रवीण माने,माजी युवकाध्यक्ष अविनाश बांदल,जेष्ठ समाजसेवक अजिनाथ चौधरसर,प्रतापराव घाडगे,परवेज सय्यद,संभाजी माने,महा.राज्य प्रदेश सरचिटणीस अनिकेत पवार,उपाध्यक्ष पार्थ गालिंदे,ओंकार महाडीक तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच अद्याप कोणत्याही मतदार यादीत नाव नोंदले गेले नसलेल्या नागरिकांसाठी हा विशेष मतदार नोंदणी उपक्रम राबविण्यात आला आहे. नवीन मतदारांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे, ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत करणे आणि नाव नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.






