इंदापूर

राष्ट्रसेवा दल व महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा.

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातून केले ध्वजारोहण.

राष्ट्रसेवा दल व महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा.

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातून केले ध्वजारोहण.

इंदापूर:-प्रतिनिधी.
दरवर्षी 15 ऑगस्ट दिवशी संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा करण्यात येत असतो.मात्र यंदा संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी देशात मोठया आनंदात साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिवसावर कोरोनाच्या साथीच्या रोगामुळे काही बंधने असल्या कारणाने तसेच शाळा कॉलेज बंद असल्याने सर्वांचाच हिरमोड झाल्याचे पहावयास मिळत आहे.

दरम्यान आज दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 9 वाजता इंदापूर येथील सावतामाळी नगर येथे पावसाची रिपरिप सुरू असताना सुद्धा देशाप्रती प्रेम व्यक्त करून एका सर्वसामान्य शेतकरी असणाऱ्या विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.

यंदा कोरोनामुळे कोणत्याही मोठ्या नेत्याला किंवा अधिकाऱ्यांना न बोलवता शासनाने घालून दिलेल्या नियम अटींचे काटेकोरपणे पालन करून तसेच सामाजिक अंतर ठेवून राष्ट्र सेवा दल,महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे तालुकाध्यक्ष रमेश शिंदे,महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय शिंदे,हनुमंत शिंदे व अन्य सेवादल सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button