राष्ट्रीय ओबीसी मोर्चा कडून उद्या भारत बंदची हाक
भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांचे बंद ला जाहीर समर्थन
राष्ट्रीय ओबीसी मोर्चा कडून उद्या भारत बंदची हाक
भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांचे बंद ला जाहीर समर्थन
इंदापूर : प्रतिनिधी
ओबीसी जातिनिहाय जनगणना, ईव्हीएम मशीन वरती निवडणूका न घेता बॅलेट पेपर वर घ्याव्यात अशा विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ओबीसी मोर्चा कडून बुधवारी (दि.२५) भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. या बंद ला भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाहीर समर्थन दर्शविले आहे.
खाजगी क्षेत्रामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांना आरक्षण लागु करावे,एम.एस.पी चा गॅरंटी कायदा बनवुन शेतकऱ्यांना द्यावा,जुनी पेन्शन योजना लागू करावी,मध्यप्रदेश, झारखंड व उड़ीसा या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ लागू करावे,पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींचे विस्थापन केल्याच्या विरोधामध्ये,सक्तीने होणारे कोरोना लसीकरण (Vaccination),मजुरांच्या विरोधामध्ये बनविलेल्या श्रम कायद्या या विषयांसह अन्य काही मुद्द्यांवर उद्याचा भारत बंद पुकारला असल्याचे राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे बलभीम राऊत यांनी सांगितले.