क्रीडा

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट व बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी .

खेळाडूंवर नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षा

राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट व बारामतीच्या खेळाडूंनी मारली बाजी ...

खेळाडूंवर नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षा

बारामती वार्तापत्र

कर्नाटक राज्यात झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्रराज्य पुरूष संघाने अप्रतिम खेळ करत, छत्तीसगड, गोवा , बिहार, कर्नाटक, पुदुचेरी आणि अंतिम फेरीत हरीयाणाचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले व विजेतेपद प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले .

तसेच महाराष्ट्र महीला संघाने रौप्यपदक मिळवले असुन तर मिश्र संघाने कास्यपदक पटकावत तिहेरी यश संपादन केले या संघात खेळाडू म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुनिर तांबोळी यांचे चिरंजीव बारामतीचे आयान मुनिर तांबोळी यांच्यासह सिद्धेश दरेकर, हर्ष यादव, रणवीर गुळूमकर तसेच बारामतीची महीला संघाची खेळाडू प्रतिनिधी मेहरूनीसा तसलिम शेख हिने संघाचे उपकर्णधारपद निभावले या बारामतीच्या सर्व खेळाडूंनी भाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्तम खेळाडू म्हणून महाराष्ट्रराज्य संघास प्रथम सुवर्णपदक तसेच रौप्यपदक, व संमिश्र टीमने कास्यपदक मिळवून दिले.

व राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला तिहेरी मुकुट मिळवून देत मानाचा तुरा रोवला व डॉजबॉल टीम मध्ये बारामतीचे नावलौकिक केले या सर्व खेळाडूंवर नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे….

Related Articles

Back to top button