स्थानिक

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बारामतीत प्रशिक्षणार्थिनी घेतली मतदान प्रतिज्ञा

आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावण्याची प्रतिज्ञा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बारामतीत प्रशिक्षणार्थिनी घेतली मतदान प्रतिज्ञा

आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावण्याची प्रतिज्ञा

बारामती वार्तापत्र

बारामती तालुका प्रचार-प्रसिद्धी अंतर्गत आज, 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.

या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, तालुका स्वीप प्रमुख सविता खारतोडे तसेच सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मतदार जागृतीचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

Back to top button