
राष्ट्रीय महाकाल सेनेच्या वतीने कर्तुत्वान महिलांचा सन्मान
“आदर्श पत्रकार सन्मान”
बारामती वार्तापत्र
बारामती येथे श्री महाकाल सेना सेवा संस्थेची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा बैठक व पदाधिकाऱ्यांची मेळाव्याची सभा संपन्न होऊन बारामती तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व पत्रकारांना “आदर्श पत्रकार सन्मान” तसेच गोहत्या प्रतिबंधक कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना “गो रक्षक अधिकारी सन्मान” देऊन सन्मानित करण्यात आले आहेत.
या प्रसंगी राष्ट्रीय महाकाल सेनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष दीपकभाई सपके , उपाध्यक्ष अजयभाऊ पासी,सचिव मारुती कांबळे , राष्ट्रीय सल्लागार सुश्रुत हत्तरगे , उपमहामंत्री रोहनभाऊ माने ,राज्य युवक प्रदेशाध्यक्ष चेतनभाऊ भोपी, हेमंत भाऊ बच्छाव, राज्य सरचिटणीस अमितजी बगाडे ,जिल्हाध्यक्ष गुरुवर्य प्रकाश भाऊ शिंदे ,शहराध्यक्ष विशाल कोळे, युवराज काळे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अनिताताई अग्रवाल,पुणे जिल्हाध्यक्ष पल्लवी चांदगुडे आदींसह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील तरुणाई ड्रग्स, एमडी, इंजेक्शनसारख्या व्यसनांमध्ये अडकून गुन्हेगारीकडे वळत चालली आहे. या धोकादायक प्रवृत्तीला आळा असावा,समाजाने तसेच तरुणांनी या व्यसनाधीनतेविरोधात पुढे यावे आणि युवकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी कार्यरत रहावे,
“धर्मांतर रोखा, धर्माचा प्रसार करा” या हाकेतून समाजाला सजग करा, व आदर्श हिंदुस्तान करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे लागणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष दीपकभाई सपके यांनी सांगितले आभार अमित बगाडे यांनी मानले.