राष्ट्रीय लोक न्यायालयामळे बारामती तालुक्यातील जोडले गेले तटलेले संसार
एकमेकांना माफ करा आणि आनंदी राहा' असा त्या जोडप्यांना आर्शिवाद दिला.
राष्ट्रीय लोक न्यायालयामळे बारामती तालुक्यातील जोडले गेले तटलेले संसार
एकमेकांना माफ करा आणि आनंदी राहा’ असा त्या जोडप्यांना आर्शिवाद दिला.
.
बारामती वार्तापत्र
दि.०७.०५.२०२२ रोजी बारामती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल व दाखल पूर्व प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी राष्ट्रीय
लोक न्यायालयाचे आयोजन बारामती तालुका विधी सेवा समिती तर्फे करण्यात आले होते.
बारामती तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा मा. जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती. जे.पी. दरेकर यांच्या मार्गदशानाखाली सकाळी ११:०० वाजता लोक न्यायालयास प्रारंभ करण्यात आला. त्यास पक्षकारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
यामधील सर्वात वैशिष्टपूर्ण भाग असा होता की, पुणे जिल्याचे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.संजय देशमुख यांनी दृक-श्राव्य
माध्यमातून बारामती न्यायालयात लोक न्यायालयासाठी हजर असलेल्या पाच प्रकरणातील जोडप्यांना समुपदेशन केले.
त्यापैकी एक प्रकरण दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर, श्री. अरबाड, दोन प्रकरणे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री.
देशपांडे व उर्वरित दोन प्रकरणे ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर श्री, कांबळे यांच्या न्यायालयातील होती.
वरील सर्व प्रकरणे ही वैवाहिक वादाची म्हणजेच घटस्फोटाची अथवा नांदायला येण्यासाठीची होती.
त्या प्रकरणातील जोडप्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने त्या जोडप्यांनी एकत्र राहून संसार करणे, एकमेकांना आयुष्यभराची साथ देणे कसे महत्वाचे आहे हे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांनी स्वत: समुपदेशनाद्वारे पटवून दिले.
यावेळी त्यांनी एकमेकांना माफ करा आणि आनंदी राहा’ असा त्या जोडप्यांना आर्शिवाद दिला.
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जोडप्यांचे स्वतः समुपदेशन करुन मध्यस्थांची भूमिका पार पाडल्याने त्या दोन्ही जोडप्यांनी ‘झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे’ या उक्तीला सार्थ करत त्यांच्यातील मतभेद विसरुन त्यांचे आयुष्य नवीन वळणावर नेवून आयुष्यभरासाठी साथसंगत करण्याचे निश्चित केले, लोक न्यायालयामुळे त्या जोडप्यांचा आपसातील वाद मिटवून त्यांचा संसार पुन्हा सुरळीत सुरु झाला याचे समाधान उपस्थितांच्या चेह-यावर दिसत होते.
या प्रसंगी त्या सर्व जोडप्यांनी मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे श्री. संजय देशमुख, बारामती येथील जिल्हा न्यायाधीश-१, मा,
श्रीमती, जे.पी. दरेकर व पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बारामती श्री. एस.एस, उबाळे यांचे आभार मानले, यावेळी लोक न्यायालय पॅनल सदस्य,वकील संघाचे अध्यक्ष श्री, बी.डी.कोकरे,उपद्मक्ष्य अजित शेरकर,उपद्मक्ष्य राजकीरण शिंदे व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.