राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बारामती नगरपरिषद कार्यालया समोर,ठिय्या आंदोलन
नगरपरिषदेचे मुख्यधीकारी यांना निवेदन देण्यात आले
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बारामती नगरपरिषद कार्यालया समोर,ठिय्या आंदोलन
नगरपरिषदेचे मुख्यधीकारी यांना निवेदन देण्यात आले.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज बारामती नगरपरिषद कार्यालया समोर,जळोची मधे कोव्हीड 19 विरहीत पर्यायी स्मशानभूमी चे बांधकाम करणे बाबत आज ठिय्या आंदोलन करण्यात आले व कृत्रिम प्रेताला अग्नी देऊन नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
जळोची येथील स्मशानभूमीत सध्या कोव्हिड रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे अन्य लोकांसाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही. परिणामी एखादे मयत झाल्यास त्यांचे दहन करायचे कुठे हा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बारामती नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेसमोर कृत्रिम प्रेताचे दहन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. नागरिकांच्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास जळोची गावातील मयत व्यक्तीचे नगरपरिषदेसमोर दहन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते संदीप चोपडे, तालुकाध्यक्ष अमोल सातकर, चंद्रकात वाघमोडे, महादेव कोकरे, रेवण कोकरे, अविनाश मासाळ, किशोर सातकर, शैलेश थोरात, निखील दांगडे, सुधीर वाघमोडे, प्रमोद धायगुडे, निलेश सातकर, करण गोसावी, भुषण सातकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.